आज कुणीतरी यावे
आज कुणीतरी यावे
ओळखिचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर
तसे तयाने गावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा
हाती हात धरावे
सोडुनिया घर नातीगोती
निघून जावे तया संगती
कुठे तेही ना ठावे
ओळखिचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर
तसे तयाने गावे
विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्नेह जुळवा
हाती हात धरावे
सोडुनिया घर नातीगोती
निघून जावे तया संगती
कुठे तेही ना ठावे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | मुंबईचा जावई |
राग | - | मल्हार |
गीत प्रकार | - | चित्रगीत, ऋतू बरवा |