आज मी नाथा घरी
आज मी नाथा घरी आलो
जनार्दनाचे रूप पाहता एकरूप झालो
आज पाहिले पावन पैठण
नाथांचे मज घडले दर्शन
सुखदु:खाचे तुटता बंधन, आनंदाने मीही नाचलो
भावार्थातील अर्थ उमगला
आनंदाच्या लहरी उठल्या
आत्मसुखाचा प्रत्यय आला, 'मी'पण माझे विसरुनी गेलो
धन्य नाथ ते, त्यांचे पैठण
सुधारणेचे हे नंदनवन
तारी जगता एक जनार्दन, चरणी त्यांच्या मी विसावलो

गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | भानुकांत लुकतुके |
स्वर | - | कैलासनाथ जैस्वाल |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |