A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राया चला घोड्यावरती

रात अशी बहरात राजसा, तुम्ही नका ना रुसू
अहो राया चला घोड्यावरती बसू!

नवा देखणा आणा घोडा
जिन कसुनी लगाम जोडा
झुलती रिकीब खाली सोडा
उगा वाटतं खूप फिरावं
नकाच काही पुसू
अहो राया चला घोड्यावरती बसू!

नेशिन साडी नव्या घडीची
गर्भ रेशमी लाल खडीची
चोळी घालीन वर ऐन्याची
निळ्या मोकळ्या आभाळावर
चंद्र लागला दिसू
अहो राया चला घोड्यावरती बसू!

मंदिल चढवा बांधा शेला
उचलून घ्या ना पुढ्यात मजला
हलक्या हाताने विळखा घाला
मिठीत येईल पुनव नभीची
कसलं आलं हसू
अहो राया चला घोड्यावरती बसू!
गीत- वसंत सबनीस
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट- सोंगाड्या
गीत प्रकार - चित्रगीत लावणी
मंदिल - जरीचे पागोटे.