A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज मी निराधार एकला

माय माउली कुठे साउली
कुठे निवारा मला?
आज मी निराधार एकला!

त्या हातांची ऊब निराळी
अंगाईच्या मंजुळ ओळी
चिऊकाऊची अंगतपंगत
अंतरलो मी तिला!

असशील कोठे आई, आई?
पोरक्यास या पदरी घेई
कशी विसरली माय मुलाला
कसा तोडला लळा?

जगी जयाला कोणी नाही
तूच तयाची होसी आई
या बाळाची कशी येइना
करुणा देवा तुला?

 

  पं. हृदयनाथ मंगेशकर