A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज पेटली उत्तर सीमा

आज पेटली उत्तर सीमा, रणांगणाचे आमंत्रण
सह्याद्रीच्या रणरूद्रा तुज हिमालयाचे हे आवाहन

कैलासाला आग लागली, शीवावरी अशीवाची स्वारी
शीवराष्ट्राच्या समर देवते गौरीशंकर तुला पुकारी

आता कर शीवशकक्ते तांडव, खड्ग हस्त आपुला उगारी
करिता 'हर हर महादेव' ही संग्रामाची झडे तुतारी

सह्याद्रीच्या समरवीरांनो हिमालयाच्या ऐका हाका
गर्जत जय जय स्वतंत्र भारत दुष्मानावर प्रहार टाका

मंगलतेचा गड रक्षाया आज करा रक्ताचे सींचन
जागृत होई मराठदेशा रणचंडी करी तांडव नर्तन