A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आला आला पाऊस आला

आला आला पाऊस आला, बघा बघा हो आला आला
पाऊस आला, पाऊस आला

काळ्या काळ्या मेघांमधुनी
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

हसली झाडे, हसली पाने
फुले-पाखरे गाती गाणे
ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला

धरणी दिसते प्रसन्‍न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा
पागोळी - छपरावरून पडणारी पाण्याची धार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  योगेश खडीकर, रचना खडीकर, शमा खळे