आली दिवाळी मंगलदायी
आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी
चला चला ग जमुनी मैत्रिणी
गुंफुया विविध फुले मधुनी
हार तोरणे गजरे माळा लौकरी
चला चला फुले आणा, आनंद झाला घरोघरी
रेखोनी रांगोळी अंगणी या
फुले चौफुले रंगी भरुया
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी
चला चला त्वरा करा, आनंद झाला घरोघरी
अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किती तरी !
चला चला पहा तरी, आनंद झाला घरोघरी
हाती सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळून घे प्राण तुझ्या पदरी
आणा आणा निरांजना, आनंद झाला घरोघरी
आनंद झाला घरोघरी
चला चला ग जमुनी मैत्रिणी
गुंफुया विविध फुले मधुनी
हार तोरणे गजरे माळा लौकरी
चला चला फुले आणा, आनंद झाला घरोघरी
रेखोनी रांगोळी अंगणी या
फुले चौफुले रंगी भरुया
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी
चला चला त्वरा करा, आनंद झाला घरोघरी
अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किती तरी !
चला चला पहा तरी, आनंद झाला घरोघरी
हाती सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळून घे प्राण तुझ्या पदरी
आणा आणा निरांजना, आनंद झाला घरोघरी
गीत | - | दत्ता डावजेकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | भावगीत |
चौफुली | - | तार्याच्या आकाराचे (asterisk *). |
रमणी | - | सुंदर स्त्री / पत्नी. |