आली कुठूनशी कानी
आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धून
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन
नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग
वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन
नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रयणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग
वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात
माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात
| गीत | - | सोपानदेव चौधरी |
| संगीत | - | वसंत आजगांवकर |
| स्वर | - | वसंत आजगांवकर |
| गीत प्रकार | - | विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत |
| कटि | - | कंबर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












वसंत आजगांवकर