अवघाचि संसार
मन माझे मोरपिशी स्वप्न जणू
मन माझे शिशिरातील इंद्रधनू
हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश
राखेतून मीच नवा घेतला आकार
उजळून जाई पुन्हा, अवघाचि हा संसार
मन माझे शिशिरातील इंद्रधनू
हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज
नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश
राखेतून मीच नवा घेतला आकार
उजळून जाई पुन्हा, अवघाचि हा संसार
गीत | - | रोहिणी निनावे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | देवकी पंडित |
गीत प्रकार | - | मालिका गीते |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- अवघाचि संसार, वाहिनी- झी मराठी. |
अलगूज | - | पावा, मुरली. |