घर दोघांचे घरकुल पाखरांचे
घर दोघांचे, घरकुल पाखरांचे
वाटा कशा निराळ्या जणू एकरूप झाल्या
एका खुळ्या जगात त्याही खुळावलेल्या
जुळले अतुट नाते दोन्ही मनामनांचे
कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही
पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही
रुजले कधी न बीज दोघांत संशयाचे
विश्वास ठेविला मी, विश्वास तू दिलास
जपलेस तू मला अन् मीही तुझ्या मनास
एका क्षणात अपुल्या सुख साधले युगांचे
वाटा कशा निराळ्या जणू एकरूप झाल्या
एका खुळ्या जगात त्याही खुळावलेल्या
जुळले अतुट नाते दोन्ही मनामनांचे
कधी भांडलोही थोडे, थोडे दुरावलोही
पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही
रुजले कधी न बीज दोघांत संशयाचे
विश्वास ठेविला मी, विश्वास तू दिलास
जपलेस तू मला अन् मीही तुझ्या मनास
एका क्षणात अपुल्या सुख साधले युगांचे
| गीत | - | सुधीर मोघे |
| संगीत | - | सुधीर फडके |
| स्वर | - | अनुराधा पौडवाल |
| चित्रपट | - | चोराच्या मनांत चांदणे |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












अनुराधा पौडवाल