आली ठुमकत नार लचकत
ग साजणी !
कुण्या गावाची कोणच्या नावाची कुण्या राजाची तू ग राणी
आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी
खुळूखुळू घुंगराच्या तालावर झाली दंग
शालू बुट्टेदार लई लई झाला तंग
सोसंना भार घामाघूम झालं अंग
गोर्या रंगाची, न्यार्या ढंगाची, चोळी भिंगाची ऐन्यावानी
डाळिंबाचं दाणं तुझ्या पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या चुरडलं गालांवरी
कबूतर येडं खुळं फिरतया भिरीभिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान, जीव हैरान येड्यावानी
कवळ्यात घेउनिया अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीत दहिंवरात भिजवावं
पिरतीचं बेन तुझ्या काळजात रुजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं, र्हाउ जोडीनं राजारानी

गीत | - | जगदीश खेबूडकर |
संगीत | - | राम कदम |
स्वर | - | विष्णू वाघमारे 'वाघ्या' |
चित्रपट | - | पिंजरा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कवळ्यात | - | मिठीत. |
दहिंवर | - | दंव. |