A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आह्मां नकळे ज्ञान

आह्मां नकळे ज्ञान नकळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद नकळे आह्मां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥
अष्टांग योग - यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधि.
याग - पूजा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.