A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आम्ही हाव जातीचे कोली

वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव

दरियावरी आमुची डोले होरी
घेऊन माशांच्या ढोलीन्‌ आम्ही हाव जातीचे कोली

वादल असो वारा नाही तो पावसाच्या धारा
तुफान दरिया लाटांचा मारा
ह्यो कोली नाई कोनाच्या धमकीस भिनारा

खंडू देवाचा लावून भंडारा
त्यावर भरवसा ठेवून की सारा
वादल वार्‍यांशी गाठू किनारा

दर्यासागर हाय आमचा राजा
त्याचे जिवावर आम्ही करताव मजा
नारलपुनवेला नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाचा
नाखवा - जहाजावरचा मुख्य नावाडी, तांडेल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.