A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंधाराची खंत तू

अंधाराची खंत तू कशाला करिसी रे?
गा प्रकाशगीत !

रोज नवी ही उषा उगवते
कवच भेदुनी अंधाराचे
कळीकळीच्या कोशामधुनी
निसर्ग गातो गीत उद्याचे
संजीवन हसते नाशामधुनी, हीच जगाची रीत !

दु:ख निराशा दूर सारुनी
सदा पडावे पाऊल पुढती
गतकाळाची कशास भीती?
भविष्य अपुले अपुल्या हाती
फुलव निराळे तुझ्या मुठीतुनी, तूच तुझे संचित !
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
संजीवन - पुनुरुज्‍जीवन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.