A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आह्मीं जावें कवण्या

आह्मीं जावें कवण्या ठायां ।
न बोलसी पंढरीराया ॥१॥

सरिता गेली सिंधूपाशीं ।
जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥

जळ कोपलें जळचरासी ।
माता न घे बालकासी ॥३॥

जनी ह्मणें आलें शरण ।
जरी त्वां धरिलेंसे मौन्‍य ॥४॥
सरिता - नदी.
सिंधु - समुद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.