A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हरिनाम सदोदित गाई रे

सुवर्णमणि सोनिया ।
ये कल्लोळु जैसे पाणिया ।
तैसा मज धनंजया ।
शरण ये तूं ॥

हरिनाम सदोदित गाई रे !

नलगे साधन
नलगे जपतप
स्‍मर नित्‌ विठ्ठल-रखुमाई रे !

ज्या योगी न पावती योगबले
ज्या ज्ञानी न जाणती ज्ञानबले
वश भक्तां हरि तू होई रे !

सुखशांती हरीचे उभयचरण
स्मरता ते पुन: नच जन्‍ममरण
सुख सर्व हरीच्या पायी रे !

जो विठ्ठलनाम निज अधरी धरी
रे त्याचे मागेपुढती हरी
जो निशिदिनी सन्‍निध राही रे !

प्रभूचे पदरज- ती तर मुक्ती
भवतारक ही हरीपद-भक्ती
पथ ह्याविण सोपा नाही रे !
उभय - दोघे.
निशिदिनी - अहोरात्र.
भव - संसार.
रज - धूळ.
पृथक्‌
सुवर्णमणि सोनया ।
ये कल्लोळु जैसा पाणिया ।
तैसा मज धनंजया ।
शरण ये तूं ॥१४००॥
(कल्लोळु- लाटा)

- श्रीज्ञानेश्वरी, अध्याय अठरावा

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.