आम्ही ठाकर ठाकर
आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखरं
या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर.
या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार.
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर.
या झांबर्या गर्दीत मांडुन इवले घर.
या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार.
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर.
गीत | - | ना. धों. महानोर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | चंद्रकांत काळे, रवींद्र साठे |
चित्रपट | - | जैत रे जैत |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
झांबरा | - | अव्यवस्थित, विस्कळीत. |