A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐका ध्रुवबाळाची कथा

मातेसंगे ईर्षा करुनी, पुत्र जातसे अढळपदा
ऐका, ध्रुवबाळाची कथा

वात्सल्याचा फुटे उमाळा
पिता बोलतो, ये ध्रुवबाळा
सवती मत्सर होई जागा, आईपोटी जळे व्यथा
ऐका, ध्रुवबाळाची कथा

दूर लोटुनी काळीज अपुले
का मातेने स्वार्था जपले?
भगवंताचा ध्यास घेउनी, बाळ चालला विजनपथा
ऐका, ध्रुवबाळाची कथा

ईर्षा धरुनी अशी मनस्वी
विजयी झाला बाल तपस्वी
अढळपदाचे दान मिळाले, प्रणाम त्याच्या मनोरथा
ऐका, ध्रुवबाळाची कथा
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - ईर्षा
गीत प्रकार - चित्रगीत
ध्रुव - उत्तानपादराजाचा मुलगा. याचा लहानपणी अपमान व निर्भत्‍सना केला गेल्याने रागावून याने वनात मोठे तप केले व ध्रुव (अढळ)पद मिळविले.
विजन - ओसाड, निर्जन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.