A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आमुचे नाव आसू ग

आमुचे नाव आसू ग !
गहिर्‍या गालांवरल्या गुलाबांच्या कलिकांनो,
ऐका ग बाई ऐका ग !

कन्या सासर्‍याशी जाते ग बाई, मागे परतुनी पहात ही आई
पापणीच्या पालखीतुनी मिरवित मिरवित नेते ग
नयनांच्या निरांजनी आम्ही जळतो वाती ग
आमुचे नाव आसू ग !

बुबुळांच्या बागेमधली ही फुलपांखरे निळी
श्रीकृष्णाच्या मुरलीवरली सात टिंबे आम्ही दिली
गवळणींच्या गळ्यांतले आम्ही हार झालो ग
आमुचे नाव आसू ग !

बिंदुएवढ्या आम्हामध्ये-
तरते जगही बुडते ग, बुडते जगही तरते ग
आमुचे नाव आसू ग !
गीत - मनमोहन नातू
संगीत - जी. एन्‌. जोशी
स्वर- जी. एन्‌. जोशी
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.