तुझे रूप राणी कुणासारखे ग
तुझे रूप राणी कुणासारखे ग?
तुझे रूप राणी तुझ्यासारखे !
तुझा रेशमी केशसंभार काळा
जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा
बटा दोन भाळावरी की जिभा त्या
तिच्या मस्तीला कोण रोधू शके?
तुझे दोन डोळे शराबी शराबी
हसे लाज गाली गुलाबी गुलाबी
असे रूपलावण्य मी प्राशितो गे
मला लाभले ते तुला पारखे !
उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे
नजर फेकिता रिते बाणभाते
विधाता करी काय हेवा तुझा गे
न्याहाळून पाही तुला कौतुके !
तुझे रूप राणी तुझ्यासारखे !
तुझा रेशमी केशसंभार काळा
जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा
बटा दोन भाळावरी की जिभा त्या
तिच्या मस्तीला कोण रोधू शके?
तुझे दोन डोळे शराबी शराबी
हसे लाज गाली गुलाबी गुलाबी
असे रूपलावण्य मी प्राशितो गे
मला लाभले ते तुला पारखे !
उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे
नजर फेकिता रिते बाणभाते
विधाता करी काय हेवा तुझा गे
न्याहाळून पाही तुला कौतुके !
| गीत | - | जगदीश खेबूडकर |
| संगीत | - | दत्ता डावजेकर |
| स्वर | - | महेंद्र कपूर |
| चित्रपट | - | शेवटचा मालुसरा |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
महेन्द्र कपूर या पंजाबी गायकाने गायलेले 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटामधील १९६६ सालचे हे गीत !
केव्हातरी त्याच दरम्यान 'हे चिंचेचे झाड' हे लोकप्रिय चित्रपटगीत कानावर पडत होते. त्यात 'चिंचे'च्या उच्चारांनी मराठी मन दुखावले जात होते. डावजेकरांनी मात्र या गीताच्या शब्दोच्चारांच्या वेळी अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत याची संपूर्ण काळजी घेतली. गीत उत्तम वठले. शब्दांना योग्य सूर मिळाले व त्या समर्पक सुरांना पार्श्वगायकाने उचित न्याय देऊन ते समर्थपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवले.
(संपादित)
सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख