आनंदघना
मम पाउली तव चाहुली
प्राणास ये सय कान्हुली
रे नंदना मनमोहना
ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना
आनंदघना
आनंदघन येई घरा
आनंदमन येई भरा
रे नंदना मनमोहना
आनंदघना
तुझिया नयनांनी प्रिये
मी माझे स्वप्न हे पाहिले
तू माझे मीपण जणू
आपुल्या हातांनी रेखिले
तुझियामुळे मी पूर्तता
तुजवाचुनी मी आर्तता
माझ्यासवे आहेस तू
मजला पुरे ही सार्थता
तुझ्यासवे, तुझ्यामुळे
तव रंग येऊ लागला
आज माझ्या ह्या मना
मम पाउली तव चाहुली
प्राणास ये रे सय कान्हुली
आनंदघन येई घरा
आनंदमन येई भरा
रे नंदना मनमोहना
आनंदघना
प्राणास ये सय कान्हुली
रे नंदना मनमोहना
ये जागवी संवेदना
दे पूर्तता या जीवना
आनंदघना
आनंदघन येई घरा
आनंदमन येई भरा
रे नंदना मनमोहना
आनंदघना
तुझिया नयनांनी प्रिये
मी माझे स्वप्न हे पाहिले
तू माझे मीपण जणू
आपुल्या हातांनी रेखिले
तुझियामुळे मी पूर्तता
तुजवाचुनी मी आर्तता
माझ्यासवे आहेस तू
मजला पुरे ही सार्थता
तुझ्यासवे, तुझ्यामुळे
तव रंग येऊ लागला
आज माझ्या ह्या मना
मम पाउली तव चाहुली
प्राणास ये रे सय कान्हुली
आनंदघन येई घरा
आनंदमन येई भरा
रे नंदना मनमोहना
आनंदघना
गीत | - | वैभव जोशी |
संगीत | - | हृषिकेश-सौरभ-जसराज |
स्वर | - | हृषिकेश रानडे, आनंदी जोशी |
चित्रपट | - | आनंदी गोपाळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |