A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आसावल्या मनाला माझाच

आसावल्या मनाला माझाच राग येतो
नाही कशी म्हणू मी, येईलही पुन्हा तो

आमंत्राणाविना तो या जीवनात आला
आला तसाच गेला, भुलवून भाबडीला
त्या दुष्ट आठवाने हृदयात दाह होतो

आता पराजितेला आधार कोण आहे?
ह्या पांगळ्या कथेचे होणार काय आहे?
शिशिरास सावराया म्हणती वसंत येतो

ताटातुटी टिकावी आता नकोत भेटी
तुटतात का परंतु ह्या घट्ट जन्मगाठी
माझे मला कळेना हा भास काय होतो
आर्त स्वरांचे तोडी रागातील हे गीत इतके करूण आहे की आशाबाई गाताना तिसर्‍या अंतर्‍याच्या पहिल्या ओळीवर आल्या की त्यांचा कंठ दाटून येई, दत्ता डावजेकर फक्त दोनच टेक घेऊ शकले. त्यानंतर 'राजकमल'मध्ये वसंत देसाई यांच्याकडे गाण्यासाठी गेल्यावर सुद्धा त्यांना गाणे शक्य झाले नाही. "वसंतराव मला पंधरा मिनिटे स्वस्थ बसू द्या." असे आशाबाई म्हणाल्या. इतक्या त्या अस्वस्थ झाल्या होत्या.

तोडी रागात शुद्ध धैवताचा प्रयोग रेकॉर्डिस्ट शर्मा यांना इतका आवडला की त्यांनी व इतरांनी दत्ता डावजेकरांची वारेमाप स्तुती केली. या उलट वर्तमानपत्रात काही समीक्षकांनी हे गीत कानाला खटकते अशी टीका केली.
(संपादित)

सौजन्य- श्री भारत बुक डेपो, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.