A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आठशे खिडक्या नवशे

आठशे खिडक्या नवशे दारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

पैठणी नेसून झाली तयार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

ठुमकत मुरडत आली सामोरं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

बोलण्यात दिसतीया खडीसाखर
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

हातात वाक्या न्‌ दंडात येळा
वार्‍यासंगं बोलतुया बागशाही मळा
आलं कसं गेलं कुठं, सळसळ वारं
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

नाकात नथणी न्‌ कानात झुबं
रखवालदार जणू बाजुला उभं
डौलानं डुलतोया चंद्रहार
कुण्या वाटंनं बा गेली ती नार

करंगळ्या मासोळ्या जोडवी जोड
पैंजण रुणझुण लावतंया याड
पाडाचा अंबा जणू रसरसदार
कुण्या वाटेनं बा गेली ती नार
गीत - पारंपरिक
संगीत - देवदत्त साबळे
स्वर- शाहीर साबळे
गीत प्रकार - कोळीगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.