आठव येतो मज तातांचा
आठव येतो मज तातांचा
मम मातेच्या मृदू हातांचा
आठवते मज नगर आमुचे
स्मरण एक ते बाळपणाचे
मम भगिनीचे, बंधुजनांचे
वीट येई या एकान्ताचा
आठव येतो मज तातांचा
प्रजापतीच्या प्रासादाची
शिखर-गोपुरे जाम्बूनदाची
आत नांदणुक आनंदाची
सदा महोत्सव स्मीतहास्याचा
आठव येतो मज तातांचा
इथे न सासू, नसे सासरा
प्राणप्रिय मी जरी शंकरा
तरीही होतो जीव बावरा
ध्यास लागतो माहेराचा
आठव येतो मज तातांचा
मम मातेच्या मृदू हातांचा
आठवते मज नगर आमुचे
स्मरण एक ते बाळपणाचे
मम भगिनीचे, बंधुजनांचे
वीट येई या एकान्ताचा
आठव येतो मज तातांचा
प्रजापतीच्या प्रासादाची
शिखर-गोपुरे जाम्बूनदाची
आत नांदणुक आनंदाची
सदा महोत्सव स्मीतहास्याचा
आठव येतो मज तातांचा
इथे न सासू, नसे सासरा
प्राणप्रिय मी जरी शंकरा
तरीही होतो जीव बावरा
ध्यास लागतो माहेराचा
आठव येतो मज तातांचा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • नृत्यनाटिका 'शिवपार्वती' (१९६८) मधील पद. |
गोपुर | - | देवळाचे मुख्य दार. |
जाम्बूनद | - | सोने. |
प्रजपती | - | ब्रह्मदेव. |