आठवणींनो उघडा डोळे
घरास माझ्या परतुनि आले
आठवणींनो, उघडा डोळे
गौरीहर तो इथे पूजिला
वाजतगाजत सासरी गेले
मिठी मारता, कर थरथरता
आसवांचे अमृत प्याले
मोठ्याची मी सून होता
नाही बघवले ह्या दैवाला
आठवणींनो, नयनी बघु द्या
कशी वागले कशी मी चुकले?
आठवणींनो, उघडा डोळे
गौरीहर तो इथे पूजिला
वाजतगाजत सासरी गेले
मिठी मारता, कर थरथरता
आसवांचे अमृत प्याले
मोठ्याची मी सून होता
नाही बघवले ह्या दैवाला
आठवणींनो, नयनी बघु द्या
कशी वागले कशी मी चुकले?
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | सून लाडकी या घरची |
गीत प्रकार | - | चित्रगीत, नयनांच्या कोंदणी |