आवडसी तूच एक ध्यास
आवडसी तूच, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला
आवडते तुजसी तसे रूप दिसो साजरे
आवडते तुजसी तसे हास्य फुलो लाजरे
गीत नव्हे, ओठांतून भाव फुटे आतला
माझ्यावर मोहिनीचे मंत्र मीच फुंकिले
आगमनाआधी तुला पूर्णपणे जिंकिले
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला
तूच एक नाथ मला, मीच तुझी सहचरी
आधारा अधीर सख्या देहलता नाचरी
भेट ठरो जन्मगाठ शुभमुहूर्त साधला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला
आवडते तुजसी तसे रूप दिसो साजरे
आवडते तुजसी तसे हास्य फुलो लाजरे
गीत नव्हे, ओठांतून भाव फुटे आतला
माझ्यावर मोहिनीचे मंत्र मीच फुंकिले
आगमनाआधी तुला पूर्णपणे जिंकिले
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला
तूच एक नाथ मला, मीच तुझी सहचरी
आधारा अधीर सख्या देहलता नाचरी
भेट ठरो जन्मगाठ शुभमुहूर्त साधला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | अपर्णा मयेकर |
चित्रपट | - | प्रीत शिकवा मला |
गीत प्रकार | - | चित्रगीत |