A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आवडती भारी मला माझे

आवडती भारी मला माझे आजोबा !

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यांत वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीता गाती, माझे आजोबा !

नातवंडा बोलावून
घोगर्‍याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा घेती, माझे आजोबा !

रागेजता बाबा-आई
आजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे, आजोबा !

खोडी करी खोडकर
आजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती, माझे आजोबा !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- आशा भोसले
चित्रपट - ऊन पाऊस
गीत प्रकार - बालगीत, चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.