A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अभिमानाने मीरा वदते

अभिमानाने मीरा वदते
हरिचरणांशी माझे नाते

गोकुळातला मुरलीवाला
मुरली घुमवित स्वप्‍नी आला
जादुगार तो श्याम सावळा
त्याच्यासाठी मीही नाचते

रुणुझुणु रुणुझुणु पैंजण बोले
जिवाशिवाचे नाते जुळले
सुखदु:खाचे बंधन तुटले
सरले माझे इथले नाते

उपहासाने खुशाल बोला
अमृत गमते जहरही मजला
भजनी-गायनी जीव रंगला
मूकभावना अर्थ शोधते