A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अबोल झाली सतार

अबोल झाली सतार
नकळत माझ्या चरणाघाते
तुटे ताणली तार

यौवनातल्या मादक नजरा
आता कोठल्या तसल्या तारा
कुठले गाणे? आता गीते-
कंठातच विरणार