A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अधीर मन झाले

अधीर मन झाले.. मधुर घन आले..
धुक्यातुनी.. नभातले..
सख्या.. प्रिया..
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले..

मी अशा रंगाची.. मोतिया अंगाची..
केवड्या गंधाची.. बहरले ना..
उमगले रानाला.. देठाला पानाला..
माझ्या सरदाराला, समजले ना..
आला रे, काळजा घाला रे..
झेलला भाला रे..
गगनभरी झाले रे..

सोसला वारा मी.. झेलल्या धारा मी..
प्यायला पारा मी.. बहकले ना..
गावच्या पोरांनी.. रानाच्या मोरांनी..
शिवारी सार्‍यांनी, पाहिले ना..
उठली रे, हुल ही उठली रे..
चाल-रीत सुटली रे..
निलाजरी झाले रे..
शिवार - शेत.