हा कोण गडे आला
हा कोण गडे आला मनमंदिरि माझ्या?
सुकुमार प्रेमकलिका ही अवचित फुलवाया
गुणगुणुनि हृदयि माझ्या
नवगीत प्रीतिचे हे
नकळे कुणी ग बाई हा जीव पिसा केला
फुलली खरीच का ही
अजि सृष्टिसुंदरी ही?
का भास असा होई नकळे उगाच हृदयी?
मिटताहि लोचनी या
कुणि हासतो कळे ना
हुरहूर लावुनीया का दूर असा गेला?
सुकुमार प्रेमकलिका ही अवचित फुलवाया
गुणगुणुनि हृदयि माझ्या
नवगीत प्रीतिचे हे
नकळे कुणी ग बाई हा जीव पिसा केला
फुलली खरीच का ही
अजि सृष्टिसुंदरी ही?
का भास असा होई नकळे उगाच हृदयी?
मिटताहि लोचनी या
कुणि हासतो कळे ना
हुरहूर लावुनीया का दूर असा गेला?
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | केशवराव भोळे |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
चित्रपट | - | कुबेर |
राग | - | मिश्र भीमपलास |
गीत प्रकार | - | चित्रगीत |