साउली मी तुझी होउनी
          साउली मी तुझी होउनी यायचे
तू जिथे, तिथे थांबायचे
जेथुनी ही तुझी चालली पाऊले
मी फुलांची तुझी वाट रे जाहले
प्राण देऊन का प्राण मागायचे?
तू जिथे, तिथे थांबायचे
तोल ना सावरे, खोल हे भोवरे
पूर ना आवरे, दूर ती गोपुरे
जान्हवी होऊन आज वाहायचे
तू जिथे, तिथे थांबायचे
या पुढे जायचे स्वर्ग हे संपले
मागुती यायचे मार्ग हे संपले
होऊदे रे तुझी, होउदे व्हायचे
तू जिथे, तिथे थांबायचे
          तू जिथे, तिथे थांबायचे
जेथुनी ही तुझी चालली पाऊले
मी फुलांची तुझी वाट रे जाहले
प्राण देऊन का प्राण मागायचे?
तू जिथे, तिथे थांबायचे
तोल ना सावरे, खोल हे भोवरे
पूर ना आवरे, दूर ती गोपुरे
जान्हवी होऊन आज वाहायचे
तू जिथे, तिथे थांबायचे
या पुढे जायचे स्वर्ग हे संपले
मागुती यायचे मार्ग हे संपले
होऊदे रे तुझी, होउदे व्हायचे
तू जिथे, तिथे थांबायचे
| गीत | - | वसंत निनावे | 
| संगीत | - | |
| स्वर | - | शोभा गुर्टू | 
| गीत प्रकार | - | भावगीत | 
| गोपुर | - | देवळाचे मुख्य दार. | 
| जान्हवी | - | गंगानदी. | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !