अज्ञात तीर्थयात्रा
          अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गूढ वरती
मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती
काही खरे न येथे ही राख सत्य आहे
बाजार बाहुल्यांचा आभाळ फक्त पाहे
सारे झरे सुखाचे दु:खाकडेच वळती
हा ऊन-सावल्यांचा उकलेल गोफ का हो?
डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो?
नावा रित्याच येती आणि रित्याच जाती
          मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती
काही खरे न येथे ही राख सत्य आहे
बाजार बाहुल्यांचा आभाळ फक्त पाहे
सारे झरे सुखाचे दु:खाकडेच वळती
हा ऊन-सावल्यांचा उकलेल गोफ का हो?
डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो?
नावा रित्याच येती आणि रित्याच जाती
| गीत | - | रमेश वैद्य | 
| संगीत | - | सुधीर मोघे | 
| स्वर | - | रवींद्र साठे | 
| गीत प्रकार | - | भावगीत, नयनांच्या कोंदणी | 
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.
            
 
   
   
   
   
   
   
   
   
   
  











 दाद द्या अन् शुद्ध व्हा !
 दाद द्या अन् शुद्ध व्हा !