अगा करुणाकरा
अगा करुणाकरा करितसें धांवा ।
या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें ।
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥
मागेंपुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥
तुका ह्मणे आतां करीं कृपादान ।
पाउलें समान दावीं डोळां ॥६॥
या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें ।
व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥
मागेंपुढें अवघा दिसे रिता ठाव ।
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥
तुका ह्मणे आतां करीं कृपादान ।
पाउलें समान दावीं डोळां ॥६॥
| गीत | - | संत तुकाराम |
| संगीत | - | श्रीनिवास खळे |
| स्वर | - | लता मंगेशकर |
| राग / आधार राग | - | तोडी |
| गीत प्रकार | - | संतवाणी, विठ्ठल विठ्ठल |
मूळ रचना
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥२॥
मागेंपुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥३॥
उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥४॥
उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥५॥
तुका ह्मणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥६॥
संदर्भ- श्रीसंत तुकाराम यांची अभंगांची गाथा
संग्राहक- माधव कृष्ण देशमूख, शंकर वामन दांडेकर
सौजन्य- चित्रशाळा प्रकाशन, पुणे.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












संपूर्ण कविता / मूळ रचना