A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अहा भारत विराजे

अहा भारत विराजे, जगा दिपवीत तेजे

भादव्यात येती गौरी गणपती उत्सवा येई बहार
मेळे आरास करोनी, गाती नाचुनी हसुनी
ध्वनी त्यातहि गाजे, अहा भारत विराजे

नवरात्र पूजेची आश्विनशोभा करिती नारी शृंगार
लेऊनि वसने मजेदार, गळा विविध अलंकार
ध्वनी त्यातुनि निनादे, अहा भारत विराजे

आली दिवाळी भूवन उजळी आनंद घे अवतार
दीपक नभीचे भूवरी येती दाविती शोभा अपार
मुदित हृदय सजती करिती सकलजन विहार
माला तोरणे फुलांची, वसने भूषणे जनांची
शोभा पाहुनी धरेची, मनी स्वर्गही लाजे
अहा भारत विराजे
गीत - शांताराम आठवले
संगीत - केशवराव भोळे
स्वर- वासंती
चित्रपट - कुंकू
ताल-दादरा
गीत प्रकार - चित्रगीत
मुदित - हर्षभरित, आनंदित.
वसन - वस्‍त्र.
विराजणे - शोभणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.