अहो जाईजुईच्या फुला
अहो जाईजुईच्या फुला
जरा हसुन माझ्यासंगं बोला
जीवघेणा पुरे हा अबोला
काय आगळिक सांगा तरी घडली?
माझी माया कशी हो तुम्ही तोडली?
गोरागोरा हो तुमचा रंग
पिकलं लिंबू नितळ तसं अंग
चोळी ल्याले गजनाची तंग
लाल शालूची आज घडी मोडली
माझी माया कशी हो तुम्ही तोडली?
चांद पुनवेचा वर सरकला
मोगरा शेजेवर सुकला
ताटकळून जीव राया थकला
घ्या हो मिठीत काया अवघडली !
माझी माया कशी हो तुम्ही तोडली?
जरा हसुन माझ्यासंगं बोला
जीवघेणा पुरे हा अबोला
काय आगळिक सांगा तरी घडली?
माझी माया कशी हो तुम्ही तोडली?
गोरागोरा हो तुमचा रंग
पिकलं लिंबू नितळ तसं अंग
चोळी ल्याले गजनाची तंग
लाल शालूची आज घडी मोडली
माझी माया कशी हो तुम्ही तोडली?
चांद पुनवेचा वर सरकला
मोगरा शेजेवर सुकला
ताटकळून जीव राया थकला
घ्या हो मिठीत काया अवघडली !
माझी माया कशी हो तुम्ही तोडली?
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वराविष्कार | - | ∙ शोभा गुर्टू ∙ ललिता फडके ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | लावणी |
टीप - • स्वर- शोभा गुर्टू, संगीत- दशरथ पुजारी. • स्वर- ललिता फडके, संगीत- कमलेश-शैलेश, चित्रपट- रानपाखरं (१९५६). |
आगळिक | - | मर्यादेचे उल्लंघन. |
गजनी | - | एक प्रकारचे गर्भसुती वस्त्र. |
शेज | - | अंथरूण. |