A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजि आले गं सखि माझे

अजि आले गं सखि माझे
प्रियकर दूर देशीचे राजे

शमला गं संताप पाहुनी
मीलन सूख ते घेता मिळुनी
अधरावरती आनंदाचे मंगल गीत विराजे

घनगर्जित ऐकुनी बावरी
उन्मन होउनी मत्त मयुरी
नाचे थय थय उन्मादाने, रुणुझुणु पैंजण वाजे

भेटताच सखि प्राण जीवना
पळात विझल्या सकल वेदना
अश्रूंची जाहली फुले ग, दु:ख मनोमनी लाजे

चंद्र पाहता फुले कमलिनी
तशीच मीही गेले फुलुनी
दलादलावर स्पर्श उमटला, मला मिळाले माझे

हरि कैवारी भक्तजनांचा
रहिवासी तो सकल मनांचा
मीरा विरहिणी मुक्त जाहली, द्वैत गळाले माझे
गीत -
संगीत - प्रभाकर जोग
स्वर- सुधा मलहोत्रा
गीत प्रकार - हे श्यामसुंदर
उन्मनी - देहाची मनरहित अवस्था.
कमळिणी - कमलिनी. कमळण. कमळाची वेल.
द्वैत - जोडी / भेदभाव / देह व जीव वेगळे मांडणे / एका वनाचे नाव.
मद - उन्माद, कैफ
विराजणे - शोभणे.
शमणे - शांत / स्तब्ध, निश्चल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.