A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना
मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना !

समजूत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच रडताहि तू हसावे
ते आज का नसावे? समजावणी पटेना
धरिला असा अबोला की बोल बोलवेना !

की गूढ काहि डाव? वरचा न हा तरंग !
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग?
रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना !