A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आजवरि पाहुनि वाट

आजवरि पाहुनि वाट देह किरे झुरला । जिवलगा ।
डोळयांत प्राण बघ उरला ॥

भरास आला खेळ, जाब हा कोणि तरी उकला । जिवलगा ।
माझाच डाव कां हुकला ॥

पुरती झाली सांज, कळप हा विसांवत बसला । जिवलगा ।
तो कीर कुणिकडे फसला ॥

बहरुनि आला बाग, चहुंकडे रंगरस झुकला । जिवलगा ।
माझाच मोगरा सुकला ।

(चाल)
कां पाडिसि देवा, वज्रचुड्याला तडा ।
कुणिकडे उडाला मुद्रिकेतला खडा ।
हरपला मणिच मग उदास नागिणफडा ।
धरुनि भरवसा जीव ज्यावरति आजवर ठरला । जिवलगा ।
तो आज वायदा सरला ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - मास्टर दीनानाथ
स्वर- मास्टर दीनानाथ
नाटक - राजसंन्यास
चाल-कुठवर पाहू वाट माथ्यावर चंद्र (लावणी)
गीत प्रकार - नाट्यसंगीत
कीर - पोपट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.