A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भावूक दोन डोळे

भावूक दोन डोळे, ना वीट गारगोटी
प्रीतीस पारखे ते रडणार प्रीतिसाठी !

ती एक वेल होती चैत्रात मोडलेली
ती एक गोष्ट होती अर्ध्‍यात सोडलेली
कंठात दाटलेले आले अखेर ओठी !

जी वाट चालले मी, ती जाय वाळवंटी
वेड्यापरी उन्हात मी राहिले करंटी
मी एकटीच आता कोणी पुढे न पाठी !
करंटा - अभागी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.