अक्रूरा नेऊ नको माधवा
नेऊ नको माधवा, अक्रूरा
नेऊ नको माधवा
क्रूर अक्रूरा नकोस नेऊ
आनंदाचा ठेवा
खेळगडी तो गोपाळांचा
गिरिधारी रे भक्तजनांचा
तारी गोकुळ कान्हा अमुचा
सर्व सुखाचा अमोल ठेवा
कुंजवनी रे रास रंगली
तालावरती टिपरी घुमली
धुंद रात्र रे स्वप्नी उरली
ऐकू दे मज मंजुळ पावा
नकोस नेऊ बालमुकुंदा
वेडी होईल गौळण राधा
तुला विनविती नंद-यशोदा
नेऊ नको माधवा
नेऊ नको माधवा
क्रूर अक्रूरा नकोस नेऊ
आनंदाचा ठेवा
खेळगडी तो गोपाळांचा
गिरिधारी रे भक्तजनांचा
तारी गोकुळ कान्हा अमुचा
सर्व सुखाचा अमोल ठेवा
कुंजवनी रे रास रंगली
तालावरती टिपरी घुमली
धुंद रात्र रे स्वप्नी उरली
ऐकू दे मज मंजुळ पावा
नकोस नेऊ बालमुकुंदा
वेडी होईल गौळण राधा
तुला विनविती नंद-यशोदा
नेऊ नको माधवा
| गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
| संगीत | - | दशरथ पुजारी |
| स्वर | - | सुमन कल्याणपूर |
| गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
| अक्रूर | - | कृष्णाचा पक्षपाती. याला कंसाने कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने गोकुळातून मथुरेस आणण्यासाठी पाठवले. परंतु त्याने कंसाचे सर्व बेत कृष्णाला सांगितले. |
| कुंज | - | वेलींचा मांडव. |
| पावा | - | बासरी, वेणु. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सुमन कल्याणपूर