A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अमृताची गोडी तुझ्या

अमृताची गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा दु:खी जीवनात

भजनी रंगावे, जग विसरावे
राम-नाम घ्यावे, चिपळ्यांची साथ

माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भक्तितरंगी दंग नाचे कीर्तनात

नाव तुझे देवा, केशवा-माधवा
कोणतेही ठेवा, गोडवा तयात

 

Print option will come back soon