A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अमृताहूनि गोड नाम

अमृताहूनि गोड नाम तुझें देवा ।
मन माझें केशवा कां बा नेघे ॥१॥

सांग पंढरिराया काय करुं यासी ।
कां रूप ध्यानासि नये तुझें ॥२॥

किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें ।
मन माझें गुंतलें विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति ।
नये माझ्या चित्तीं नामा ह्मणे ॥४॥
नेघणे - न घेणे.
विषयवासना (विषय) - कामवासना.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.