A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आनंदी-आनंद भरला

आनंदी-आनंद भरला
अवघा दाही दिशां कोंदला

संत सज्जनांचा मेळा
भक्तीरंगाने रंगला

विठ्ठल नामाचा गजर
पंढरी वैकुंठ भूवर

टाळ मृदुंग वीणा वाजे
पुण्य सोहळा हा गाजे