अनंता अंत नको पाहू
आलासी तू ऐकुनी धावा, काय तुला देऊ?
अनंता, अंत नको पाहू
अतिथी अचानक आश्रमी आले, ज्या समयी नच काही उरले
तशात म्हणती भूक लागली, कशी मी समजावू?
दही-दूध-लोणी मागू नको रे, रिते घडे तुज दिसतील सारे
धुतल्या थाळीवरी पान ते नकोस तू ठेवू
कसे मागसी इतुके देवा? मजसी गमे ना कुठला कावा
योगेश्वर तू अंतर्ज्ञानी थोरवी किती गाऊ?

गीत | - | अण्णा जोशी |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | माणिक वर्मा |
राग | - | कलावती |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भक्तीगीत |
कावा | - | कारस्थान / लबाडी, ढोंग. |
Print option will come back soon