अंगणी गंगा घरात काशी
काय मागू मी कोणापाशी
अंगणी गंगा घरात काशी
देवाहुनही उदार सुंदर
सुवासिनीचा श्रीविश्वेश्वर
जवळी माझ्या वसे दिननिशी
तपावाचुनी कृपा लाभली
हिरवळ पायी, शिरी सावली
सौख्य सजविते तनामनाशी
स्वप्नाहून हे सत्य मनोहर
अमृत सांडे तृप्त मनावर
प्रमोद कवळी दाही दिशांशी
अंगणी गंगा घरात काशी
देवाहुनही उदार सुंदर
सुवासिनीचा श्रीविश्वेश्वर
जवळी माझ्या वसे दिननिशी
तपावाचुनी कृपा लाभली
हिरवळ पायी, शिरी सावली
सौख्य सजविते तनामनाशी
स्वप्नाहून हे सत्य मनोहर
अमृत सांडे तृप्त मनावर
प्रमोद कवळी दाही दिशांशी
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | जावई माझा भला |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
प्रमोद | - | आनंद. |