अंतरंगी तो प्रभाती
अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी
डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी
पाहती देहात कोणी थोर साधक उन्मनी
सानुल्या बिंदूपरी तो नांदतो संतांघरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी
भावना भिजल्याभरांनी अश्रु नयनी दाटले
अस्तिकाचे गीत गाता सार उमजे त्यातले
सर्वसाक्षी श्याम माझा राहतो हृदयांतरी

| गीत | - | गुरुनाथ शेणई |
| संगीत | - | मधुकर गोळवलकर |
| स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
| गीत प्रकार | - | भक्तीगीत, हे श्यामसुंदर |
| उन्मनी | - | देहाची मनरहित अवस्था. |
| सान | - | लहान. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.

जयवंत कुलकर्णी