A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अनुरागाचे थेंब झेलती

अनुरागाचे थेंब झेलती प्रीत-लतेची पाने
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलती धुंद तराणे

मंतरला हा कुंज लाजरा
महिवरला सुम-भार हासरा
झिरमिर झिरमिर पाऊसधारा गाती श्रावण-गाणे

मधुमय हा मृद्गंध वाहतो
बहरुनिया वनवृंद नाचतो
तरूवेलींना असे बिलगती अधिर्‍या प्रीत-सुखाने
अनुराग - प्रेम, निष्ठा.
कुंज - वेलींचा मांडव.