A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अपराध मीच केला

अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी !
जाणीव हीच माझ्या जिवा सदैव जाळी !

जन्मांत एक झाली ही प्रीतभेट देवा
डोळ्यांतुनी हळू या, हृदयात पाय ठेवा
बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी !

राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा
भासांत गुंतवावा मी जीव का कुणाचा?
अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.