A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अपार हा भवसागर दुस्तर

अपार हा भवसागर दुस्तर
तुझ्या कृपेविण कोण तरे, जय जय दुर्गे शुभंकरे !

तुझ्या कृपेने संकट टळते
तुझ्या कृपेने वैभव येते
तुझ्या कृपेने पंगू देखिल करी उल्लंघन गिरीशिखरे !

तुझ्या कृपेचा मेघ बरसता
आशेची उद्याने फुलता
ह्या संसारी विश्वमंदिरी, आनंदाचा गंध भरे !

दुराचार दंभाच्या नगरी
अनाचार अवसेच्या तिमिरी
त्रिशूळ तव चमकता अचानक दुरिताचा अंधार नुरे
दंभ - ढोंग, सोंग.
दुरित - पाप.
दुस्तर - पार करण्यास अवघड.
भव - संसार.
लंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर